Grampanchayat Election Result | पालघर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये संमिश्र कौल

Grampanchayat Election Result | पालघर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये संमिश्र कौल

वसई  ः पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल आज लागला. विशेष म्हणजे तीनही ग्रामपंचायतींवर वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व राहिले. यात पालघर तालुक्‍यातील पाली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सहा; तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले असून सत्पाळा येथे ग्रामसमृद्धी पॅनलच्या 9 जागा जिंकल्या असून 2 बविआच्या झोळीत पडल्या आहेत; तर पालघर तालुक्‍यातील सागावेमध्ये शिवसेनेने सातपैकी चार जागा जिंकल्या आहेत. 

वसई तहसीलदार कार्यालयात मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाली व सत्पाळा या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी अस्तिवाची मानली जात होती, परंतु गेली अनेक वर्षे बविआचे पाली ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व असतानादेखील एका उमेदवाराने केवळ एका मताने विजयश्री मिळवली; तर एक जागा गमवावी लागली आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसून येत आहे; तर दुसरीकडे सत्पाळा ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते, परंतु या निवडणुकीत बविआ विरुद्ध ग्राम समृद्धी पॅनल एकमेकांसमोर उभे होते. एकूण 11 जागांसाठी व मोठी मानल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीवर बविआला केवळ दोन जागा मिळवता आल्या असून, मतदारांनी कौल बदलल्याने गाव समृद्धी पॅनलचा झेंडा फडकला आहे. 

विजयी उमेदवार 

पाली ग्रामपंचायत 
औल्गा विलास दुर्गुडे, रोहित म्हात्रे, जसिंटा टायरन ग्रेशियस, सचिन डिसोझा, सुगंधा म्हात्रे, दत्तात्रय करपडे (बविआ), जयश्री चौथवे (महाविकास आघाडी) 

सत्पाळा ग्रामपंचायत 
प्रकाश डिकोन्हा, मरशान लोबो, उमेश पाटील, संगीता भांडार, मनोज वरठा, राजेश गायकवाड, राहुल किणी, कविता पाटील, गीता ठाकूर (ग्राम समृद्धी पॅनल) ज्योती दिब्रिटो, साक्षी कामसेकर (बहुजन विकास आघाडी)

Grampanchayat Election Result Results of three Gram Panchayats in Palghar district

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com