औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायती 'इको झोन'मधून वगळण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वाडा : वाडा तालुक्यात औद्योगिक करण झाले असून अनेक कारखाने येथे स्थिरावले आहेत.असे असतानाच आता औद्योगिक क्षेत्रातील काही ग्रामपंचायती या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये जाहीर केल्या आहेत. ही गावे त्यामधून वगळा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य व भाजपाच्या कार्यकर्त्या अंकिता दुबेले यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तालुक्यातील  सापरोंडे, मागांठणे व उसर ग्रामपंचायती या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये जाहीर केल्या आहेत.येथे औद्योगिककरण झपाट्याने वाढत असून बेरोजगार तरूणांना रोजगार मिळू लागला आहे.तसेच अनेक बेरोजगार तरूण कारखान्यामुळे कांही ना कांही व्यवसाय करू लागला आहे. तसेच येथे आत्ताच 420 केव्हीए क्षमतेचे विद्युत केंद तयार झाले असून त्यामुळे उद्योजकांच्य विजेचा प्रश्न संपुष्टात आला आहे. येथे जागाही मुबलक असल्याने व दळणवळणाची सुविधाही निकाली निघाल्याने उद्योजकांनी या परिसरात आपले व्यवसाय सुरू करण्यास पसंती दिली आहे.

असे असतानाच वरील ग्रामपंचायती इको झोनमध्ये समाविष्ट केल्याआहेत.सदरच्या ग्रामपंचायती या अभरण्यापासून कित्येक मैल दूर आहेत तर अभरण्यापासून अगदी जवळ असलेल्या ग्रामपंचायती या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये नाहीत मात्र दूरवरच्या ग्रामपंचायती इको झोन मध्ये आहेत. हा भेदाभेद असल्याचे निवेदनात नमूद केले आहे .

त्यामुळे या ग्रामपंचायती इको झोन क्षेत्रातून वगळा अशी मागणी दुबेले यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या कडे केली आहे.

Web Title: Grampanchayats in Industrial area should not be under Eco Zone, demands BJP workers