मुरबाडनगरला अग्निशमन केंद्रांसाठी निधी मंजूर 

  मुरलीधर दळवी
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

मुरबाड (ठाणे) : मुरबाड नगर पंचायतीला अग्निशमन केंद्र व एक अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 2 कोटी 61 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी  64 लाख रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी निधी मिळवणारी मुरबाड हि पहिलीच नगर पंचायत असल्याचे नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांनी सांगितले. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे हा निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले. अग्निशमन केंद्राचे बांधकामासाठी 2 कोटी 61 लाख 32 हजार रुपये रकमेचे अंदाज पत्रकास तांत्रिक मान्यता घेण्यास कळविण्यात आले असून 64 लाख रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे 
 
Web Title: Grant of fund for purchase of fire briged center in Murbadnagar Panchayat