शाळकरी मुले जपताहेत ग्रिटिंग कार्डची परंपरा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नवी मुंबई - दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पालक मंडळी व्हॉट्‌सऍप व मोबाईलवरून मेसेजेस पाठविण्यात गुंग असतानाच दिवाळीमध्ये ग्रिटिंग कार्ड पाठविण्याची परंपरा मुलांकडून जपली जात आहे. दिवाळीच्या सुटीचा उपयोग करीत छोटी मुले स्वहस्ताक्षरातील शुभेच्छा कार्ड तयार करण्यात मग्न आहेत.

काही वर्षांपूर्वी विशेषतः दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्र व ग्रिटिंग कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. विविध भाषांमध्ये तयार करून शुभेच्छा कार्डे विकण्याचा उद्योगही स्थिरावला होता. आर्चिज, सत्यम गॅलरीमध्ये सर्व प्रकारची शुभेच्छा कार्ड मिळत होती. पोस्टालाही सुगीचे दिवस होते; परंतु मोबाईलचा उदय झाला व छापील शुभेच्छा कार्डांचे दिवस मागे सरले. दिवाळी व इतर सणासुदीच्या शुभेच्छा मोबाईलवरूनच मेसेज अथवा व्हॉट्‌सऍपद्वारे दिल्या जाऊ लागल्या आहेत. आज संदेश देण्यासाठी व्हॉट्‌सऍप परवलीचा शब्द झाला आहे.

लहान मुलांना अद्याप मोबाईल दिला जात नाही. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लहान मुले मित्र-मैत्रिणींच्या घरी जात आहेत. विशेष म्हणजे, पेन्सिल, रंगीत खडू आणि वॉटर कलरच्या साह्याने घरगुती शुभेच्छा कार्ड बनवून दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे सहावीतील विद्यार्थिनी दीक्षिता सिन्हा हिने सांगितले. लहान मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत मोठी मंडळीही त्यांना मदत करू लागली आहेत. मुलांना दुकानातून कार्डबोर्ड पेपर, रंग आणून देण्यापासून विविध मजकूरही सुचवित आहेत.

Web Title: Greeding card tradition continued by school students