मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

तुषार सोनवणे
Tuesday, 1 September 2020

आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याला परवानगी दिली आहे.

मुंबई - केंद्र सरकारनं अनलॉक 4 संदर्भात नियमावली जारी केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर राज्यांनीही आता त्यासंदर्भातील नियमावली जारी केल्या आहेत. महाराष्ट्रात सोमवारी हा आदेश जारी करण्यात आला होता. या आदेशात आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेला ईपास आता रद्द करण्यात आला आहे. तर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याला परवानगी दिली आहे.

'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला आता कोणतेही निर्बंध नसणार आहेत. राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयानंतर मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्याला परवानगी दिली आहे, दरम्यान, राज्यांतर्गंत रेल्वे बुकिंग उद्यापासून म्हणजेच 2 सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याचे पत्रक मध्य रेल्वेने जारी केले आहे.

पूरामुळे जेईई परीक्षा देऊ न शकलेल्या त्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंत सरसावले; म्हटले की 'काळजी करू नका...

मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक डी. वाय. नाईक यांनी याबाबतचे पत्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवले आहे. नागरिकांना ईपासच्या बंधनातून दिलासा मिळाल्यानंतर आता रेल्वेनेही आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. या प्रवासाची नियमावली काय असणार आहे याबबात माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. परंतु मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा राज्यातील नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green light for inter-state railway passenger transport service; Booking will start from tomorrow

टॉपिकस
Topic Tags: