गोरेगावातील सार्वजनिक मैदान नागरिकांसाठी खुले

गोरेगावातील सार्वजनिक मैदान नागरिकांसाठी खुले
गोरेगावातील सार्वजनिक मैदान नागरिकांसाठी खुले

मुंबई ः क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकाविण्यात आलेले गोरेगावातील सार्वजनिक मैदान तातडीने स्थानिकांना खुले करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने व्हिनस स्पोर्टस अकादमीला दिला आहे. त्यामुळे आता गोरेगावकरांना एक खुले मैदान मिळणार आहे.   

व्हिनस अकादमीविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचीन चव्हाण यांनी न्यायालयात जनहित याचिका केली होती. मुंबई महापालिकेने व्हिनस कल्चरल असोसिएशनला संबंधित मैदान दत्तक दिले होते. करारानुसार ते मनोरंजनासाठी वापरणे बंधनकारक होते; मात्र त्याऐवजी त्यांनी मैदानावरील क्रिकेटची खेळपट्टी वापरण्यास प्रारंभ केला. यानुसार आठवड्यातुन दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी भरमसाठा शुल्क घेऊन क्रिकेट कोचिंग क्‍लास घेण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे यादरम्यान त्यांनी अन्य नागरिकांना मैदानावर येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे लहान मुलांचे खेळणे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरणे बंद झाले होते. असे बंधन अकादमी घालू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

मैदान म्हणजे सार्वजनिक उद्यानच 
कोणत्याही कारणांसाठी मैदानाची विशिष्ट वेळ राखून ठेवता येणार नाही आणि कोणतीही क्रीडा अकादमी अशाप्रकारे काम करु शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. मैदानाचा वापर सार्वजनिक उद्यान म्हणूनच व्हायला हवा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com