‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

मुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

जीएसटी विभागाने गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशातील ‘नॅशनल स्टील अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक नागालिंगम गोली यांना गुरुवारी (ता. १३)  अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. व्यवहारात दाखवलेल्या मुंबईतील बोगस कंपन्या नोंदणीकृत पत्त्यावर नसल्याचेही उघड झाले आहे. गोली यांनी नॅशनल स्टील अँड ॲग्रो इंडस्ट्रीजचे नोंदणीकृत कार्यालय आणि मशीद बंदर येथील विकसित इंजिनिअरिंग व भांडुप येथील मितेश ट्रेडिंग प्रा.लि. यांच्यात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दाखवले. जुलै २०१७ ते ऑगस्ट २०१८ या काळात या कंपन्यांत व्यवहार झाल्याचे इनव्हॉईस तयार केले.

बनावट व्यवहारांमुळे तोटा
या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, तिन्ही कंपन्यांमध्ये दाखवण्यात आलेल्या बनावट व्यवहारांमुळे केंद्र सरकारला प्रत्येकी १११ कोटी असा ३३३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: GST 333 Crore Rupees Non behavioral