मोदींची नाताळ भेट; थिएटरमध्ये चित्रपट पाहणे होणार स्वस्त 

शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई : वस्तू आणि सेवा कराच्या परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांपैकी एका निर्णयामुळे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणे काहीसे स्वस्त होणार आहे. थिएटरमधील तिकिटांच्या दरांवरील कर आता बदलण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 'जीएसटी' परिषद आज झाली. यामध्ये दैनंदिन आवश्‍यक अनेक गोष्टींवरील कराच्या दरांविषयी चर्चा झाली. 'जीएसटी'च्या यादीतील 33 वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय झाला आहे. 

नव्या निर्णयानुसार, थिएटरमध्ये 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर आता 18 टक्‍क्‍यांऐवजी 12 टक्के कर लागू होणार आहे. तसेच, 100 रुपयांवरील तिकिटांवर आता 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्के इतकाच कर लागू होणार आहे. त्यामुळे यापुढे थिएटरमध्ये चित्रपट पाहणे थोडे स्वस्त होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीतील काही नामवंतांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. यात चित्रपटसृष्टीशी संबंधित काही विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये तिकिटांच्या दरांवरील 'जीएसटी' कमी करण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

'जीएसटी' परिषदेच्या आजच्या निर्णयानंतर कवी प्रसून जोशी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

Web Title: GST rates slashed on Movie tickets after GST council meet