शिवसेनेपाठोपाठ मनसेचेही `केम छो`?

मुंबई ः विलेपार्ले येथे मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांचा गुजराती फलक.
मुंबई ः विलेपार्ले येथे मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांचा गुजराती फलक.

मुंबई : चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बांबूचे फटके बसतील, असे वक्तव्य भांडुप येथील प्रचारसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते, परंतु विलेपार्ले येथील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांच्या प्रचारासाठी गुजराती भाषेतील फलक लावल्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली. त्यावरून आता मनसेवर "ट्रोल'धाड आली आहे. 

मनसेच्या दणक्‍यामुळे मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजीत येणाऱ्या सूचना मराठीतही येऊ लागल्या. त्रिभाषा सूत्र ठीक आहे; पण चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केल्यास बांबूचे फटके बसल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला होता. त्याला मनसे उमेदवारानेच छेद दिल्याचे विलेपार्ल्यात दिसत आहे. 

वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी गुजराती फलक झळकले होते. त्यामुळे शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर समाजमाध्यमांवरून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी चौथ्या भाषेच्या वापराविरोधात वक्तव्य केले होते. आता मनसेच्याच उमेदवाराने गुजराती भाषेत फलक लावल्यामुळे प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com