Loksabha 2019 : नावातून ठाकरे काढा बरं : गुलाबराव पाटीलांचा राज ठाकरेंना टोला

दिनेश गोगी
शनिवार, 27 एप्रिल 2019

उल्हासनगर : ''तुमच्या नावात ठाकरे आहे म्हणून पूजा आहे. ठाकरे काढा बरं..अशा खड्या बोलात शिवसेना उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरातील कॅम्प नंबर 3 मधील चोपडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात व कॅम्प नंबर 4 मधील गजानन नगरात सभांचे आयोजन करण्यात आले होते. तेंव्हा गुलाबराव पाटील बोलत होते.

''तुम्हाला पैसे भेटतात, तुम्ही चांगले भाषण करतात हे ठीक आहे.पण आमच्या नादी लागू नका'' ,असा इशारा देखील पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला. ''आम्ही कुपोषित बालके गुबगुबीत करतो आणि समोरचा मांडीवर घेतो. आमचं पोट्ट दत्तक घेतल्याशिवाय लोकांना जमत नाही'',असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. ''ज्यांच्यावर केस नाही तो शाखाप्रमुख नाही व जो जेलमध्ये जात नाही तो तालुकाप्रमुख प्रमुख नाही'' ,असे स्पष्ट करताना 'डॉक्टर ऑफ जेल ही शिवसेनेची पदवी असल्याचे परखड मत पाटील यांनी व्यक्त केले.

''बिर्याणी करताना तेजपत्ता, लवंग, बाजा, पत्ताफुल टाकले जाते आणि बिर्याणी झाल्यावर ह्या वस्तू बाहेर काढून बिर्याणीवर ताव मारल्या जातो'' ,अशी अवस्था मुस्लिमांची करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष टोमणा गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मारला. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, महिला आघाडी संघटक, नगरसेवक मनोज लासी, महेश सुखरामानी, सुनील सुर्वे, शेखर यादव, स्वप्नील बागूल, सुरेंद्र सावंत, युवासेना उपजिल्हाधिकारी सोनू चानपूर, युवासेना अधिकारी सुमित सोनकांबळे, बाळा श्रीखंडे, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, अरुण आशान, दिलीप गायकवाड, कैलास तेजी, संदीप गायकवाड, अंकुश म्हस्के, सुरेश सोनवणे, उत्तरभारतीय नेते राजेंद्र दुबे, नगरसेविका लिलाबाई आशान, शितल बोडारे, वसुधा बोडारे, मिताली चानपूर, व्यापारी असोसिएशनचे जगदीश तेजवाणी, परमानंद गेरेजा आदींसोबत विभागप्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gulabrao Patil taunt Raj Thakre about Removing his Surname