मालमत्तेवरून गुंड राजाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - कुख्यात गुंड डी. के. राव याचा हस्तक टी. पी. राजाची हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपी इम्रानच्या अटकेनंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. 

मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र ऊर्फ टी. पी. राजा (वय ४१) शीव कोळीवाडा परिसरातील म्हाडा वसाहतीतील सूर्य निवासमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत होता. अमजद आणि इम्रान यांनी भरदुपारी घरात त्याची हत्या केली होती.

गोळीच्या आवाजाने अन्य रहिवासी राजाच्या खोलीकडे जाऊ लागले. त्या वेळी दोन्ही आरोपी पळत सुटले. त्यांची दुचाकी सुरू झाली नाही; त्यामुळे ते पळून गेले होते. पोलिसांनी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून आरोपींची ओळख पटवली.

Web Title: Gund Raja Murder by Property