गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

गेल्या काही काळापासून गुरुदास कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी गुरूदास कामत आणि संजय निरूपम यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता.

मुंबई - काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी आज (बुधवार) अखेर पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

कामत यांनी आज निवेदन प्रसिद्ध करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांना निवेदनात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी मी त्यांना मला सर्व पदांवरून मुक्त करण्याबाबत चर्चा केली.

गेल्या काही काळापासून गुरुदास कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी गुरूदास कामत आणि संजय निरूपम यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. यावेळी कामत यांनी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरूपम यांना टीकेचे लक्ष्य केले होते. संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहिले होते. 

Web Title: Gurudas Kamat quits all Congress posts