नाल्यातील गाळ नाल्यातच...

कल्याणमधील नाले सफाईत कोणाची हात सफाई; मनसेने केला व्हिडीओ व्हायरल
gutters mumbai city and cleaning mumbai corporation rain water problem mns Kapil Pawar viral video
gutters mumbai city and cleaning mumbai corporation rain water problem mns Kapil Pawar viral video sakal

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील नालेसफाईचे काम सुरु असून या ठिकाणी काही लहान मुले चक्क नालेसफाई करत आहेत. एवढेच नाही तर नाल्यातील गाळ खोऱ्याने उपसून तो त्याच नाल्यात दुसऱ्या ठिकाणी टाकला जात आहे...याचा व्हिडीओ मनसेचे पदाधिकारी कपिल पवार यांनी व्हायरल केला असून ही कोणत्या पद्धतीची नालेसफाई सुरु आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे. याविषयी पालिका अधिकाऱ्यांनी मात्र नो कमेंट्स असे उत्तर देत काढता पाय घेतला आहे. या व्हिडीओ मुळे कल्याणमधील नालेसफाईत कोणाची हात सफाई होत आहे याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता आयुक्त याविरोधात काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली शहरात पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामे सुरु आहेत. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी नालेसफाई कामाची पहाणी करत 31 मे पर्यंत ही कामे पूर्ण होतील असे निर्देश दिले आहे. शुक्रवारी मनसेचे पदाधिकारी कपिल पाटील हे परिसरातील नालेसफाई कामाची पहाणी करण्यास गेले असता रामबाग येथील मोठ्या नाल्यात काही मुले ही नालेसफाई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच ही मुले नाल्यातील गाळ खोऱ्याने उपसून त्याच नाल्यात दुसरीकडे तो गाळ टाकत होती.

त्यांनी लागलीच याचा व्हिडीओ तयार करत मुलांना देखील याविषयीची विचारणा केली असता आम्हाला साहेबांनी सांगितले नाल्यातील गाळ येथून उचलू शकत नाही, कोठे टाकू शकत नाही तर येथेच टाकावा लागेल म्हणून आम्ही ते करत असल्याचे उत्तर त्यांनी पवार यांना दिले. दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता घनःश्याम नवांगुळ हे काही अधिकाऱ्यांसह नालेसफाईचे काम पहाण्यासाठी आले असता त्यांना याविषयी विचारणा केली असता नो कमेंट्स असे बोलत त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

नालेसफाईचे काम पहाण्यासाठी दुपारी 3 वाजता रामबाग येथे आलो असता येथे लहान मुले नालेसफाई करत असून ते नाल्यातील गाळ नाल्यातच टाकत असल्याचे दिसले. हे विचित्र वाटल्याने मुलांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला साहेबांनी सांगितले असल्याचे सांगितले. 31 मे पर्यंत पूर्ण नालेसफाई करावी असे पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी सांगत आहेत. जर असेच काम चालू राहीले तर 25 मे पर्यंतच काम पूर्ण होईल. आणि यातून टेंडर मधून केवळ पैसा काढला जाईल प्रत्यक्ष काम शून्य असेल. पावसाळ्याच्या दहा दिवस आधी नालेसफाईचे काम पूर्ण होणे आवश्यक असताना आपल्याकडे दहा दिवस आधी कामास सुरुवात होते. या निष्क्रिय कामामुळे मल्हार नगर, जोशीबाग, बैलबाजार परिसरात पाणी भरुन नागरिकांचे आर्थिक नुकसान होते.

कपिल पवार, मनसे पदाधिकारी

नालेसफाईचा हा व्हिडीओच व्हायरल झाल्याने नालेसफाईचे काम कशापद्धतीने केले जातात ही बाब उघड होत आहे. यामुळे आता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी संबंधित अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याविरोधात कारवाई करणार का ? हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com