नेत्यांची बदनामी करणाऱ्यास चोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणाऱ्या एका तरुणाला चांगलाच महागात पडला.

ठाणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणाऱ्या एका तरुणाला चांगलाच महागात पडला. या तरुणाला शिवसैनिकांनी चोप देऊन कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सोमवारी (ता. २) रात्री घडली.

याप्रकरणी, कापूरबावडी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून १५१ कलमानुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. राघव बामनवार (४०) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केला होता.

हा व्हिडीओ पाहून ठाण्यातील शिवसैनिकांनी बदनामी करणाऱ्या तरुणाच्या घरी धाव घेतली. घरात शिरून त्याला चोप देऊन कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guy got smaked for Defamation of leaders