हाफकिनमध्ये लवकरच कर्करुग्ण, डॉक्‍टरांची सोय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - टाटा कर्करोग रुग्णालयातील रुग्ण आणि निवासी डॉक्‍टरांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटच्या आवारात इमारती उभारण्यात येणार आहेत. रुग्णालयाने या आराखड्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितली.

या रुग्णालयात देशभरातून येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची संख्या मोठी आहे. निवासी डॉक्‍टरांना मुंबईत ठिकठिकाणी वसतिगृहांत राहावे लागते. हाफकिनच्या आवारात सहा लाख चौरस फुटांची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यापैकी दीड लाख चौरस फुटांचे वसतिगृह शिकाऊ डॉक्‍टरांसाठी असेल.

उरलेल्या भागात या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्यात येईल, अशी माहिती डॉ. बडवे यांनी दिली. गुरुवारी (ता. 15) सकाळी या दोन इमारतींचा आराखडा मंजूर केल्याचे त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले. पाच वर्षांपूर्वी 40 डॉक्‍टर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी टाटा रुग्णालयात येत असत. आता ही संख्या 200 झाली आहे. हे डॉक्‍टर सुमारे आठ वर्षे येथे प्रशिक्षण घेतात.

Web Title: haffkine institute cancer patient doctor available