शाळांत हॅण्ड सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

ठाणे - हातांची स्वच्छता ठेवली न गेल्यास मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलांमध्ये हाताच्या स्वच्छतेची सवय वाढीला लागण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील किमान दोन वर्षांसाठी ही सुविधा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर होणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत ५५ बालवाड्या, १२१ प्राथमिक; तर वीस माध्यमिक शाळा आहेत. या शाळा ७८ इमारतींमध्ये सकाळी आणि दुपारी या दोन सत्रात भरतात. सुमारे चाळीस हजार विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी शाळेच्या प्रत्येक इमारतीमध्ये हॅण्ड सॅनिटायझर मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिका शाळांमध्ये शिकत असलेली बहुतंशी मुले ही कमी आर्थिक उत्पन्न असलेली आहेत. त्यांचा शैक्षणिक खर्च परवडत नसल्यानेच त्यांच्या पालकांकडून त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये घातले जाते. हात धुण्याची सवय लागल्यास मुलांच्‍या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

५८ लाखांचा खर्च अपेक्षित
या मुलांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी शाळेच्या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर मशीन लावले जाणार आहे. यासाठी  ५८ लाख ८३  हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात मशीनसाठी ४० लाख सहा हजार रुपये खर्च होणार आहे. तर प्रत्येक वर्षी लिक्विड पाऊचसाठी  २८ लाख  ९१ हजार याप्रमाणे तरतूद केली जाणार आहे.

Web Title: Hand Sanitizer in school