रेल्वे डब्यात रॅम लावण्याबाबत न्यायालयाने मागविले स्पष्टीकरण

mumbai local
mumbai local

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले. 

रेल्वे गाड्या अपंग प्रवासी स्नेही असाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुख्य न्या प्रदीप नंदराजोग आणि न्या नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अपंग प्रवाशांना रेल्वे डब्यात शिरणे त्रासदायक होत असते, त्यामुळे त्यांच्यासाठी रेल्वे गाडी फलाटावर थांबण्याच्या अवधीत रॅमची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वे गाडी काही सेकंदच (15 ते 20) फलाटावर थांबते, एवढ्या अवधीत अशी सुविधा उपलब्ध करणे अशक्य आहे, त्यामुळे गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते, असे रेल्वेच्या वतीने ऍड सुरेश कुमार यांनी सांगितले. याबाबत चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

रेल्वे विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवास अपंग स्नेही असायला हवा, मात्र याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप याचिकादार इंडिया सेन्टर फॉर ह्यूमन राईट्सने केला आहे. तसेच उच्च न्यायालयानेही स्यू मोटो याचिका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com