अतुल सावे यांच्या मंत्री मंडळातील समावेशाचा पालघरमध्ये आनंद  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

happiness in Palghar due to Atul Save entry in Cabinet

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे....

अतुल सावे यांच्या मंत्री मंडळातील समावेशाचा पालघरमध्ये आनंद 

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ आनंदाचे वातावरण आहेत. सावे परिवार मूळचा पालघर जिल्ह्यातील चिंचणी गावाचा अतुल सावे यांचे आजोबा दीनानाथ सावे 1949 ला चिंचणी सोडून आपले बंधू चंदुलाल सावे यांच्यासोबत तीन मुलं व एक कन्या असा परिवार घेऊन लातूर येथे गेले. त्या काळात परळी भागात रेल्वे मार्ग विकसित करण्याचे काम काम सुरू होते.

दीनानाथ सावे यांना रेल्वेचा कामाचा अनुभव असल्याने त्यांनी त्या भागातील रेल्वेमार्गाच्या कामाची कॉन्ट्रॅक्ट घेण्याचे काम सुरू केले. लातूर परिसरामध्ये विविध सामाजिक संस्था सांस्कृतिक उपक्रमात तसेच लातूरच्या शहरी भागाच्या विकासात दीनानाथ सावे यांचा मोठा वाटा होता. अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे तसेच त्यांचे दोन बंधू हे याकामी सहभागी होते. सावे परिवाराचा कामाचा व्याप वाढत होता. अनेक कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. परिवार जसजसा मोठा होत गेला तसा व्यवसाय वाढत गेला आणि अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे औरंगाबाद येथे 1965 च्या दरम्यान स्थायिक झाले. व्यवसाय वाढवताना औरंगाबाद शहरातील विविध समस्या अभ्यास करून त्यांनी सक्रिय समाजकार्यात उडी घेतली.

वेगवेगळे प्रश्न हाताळले अनेक अनेक लोकांशी संपर्क जोडला. 1988 ला औरंगाबादचे नगरसेवक म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. 1989 ते 1990 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर म्हणून पदभार सांभाळला. तद्नंतर झालेल्या नव्या लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांची औरंगाबाद मतदारसंघातून निवड झाली. 1991 ते 1996 या दहाव्या लोकसभेमध्ये त्यांनी औरंगाबादचे प्रतिनिधित्व केले. उद्योगपती व्यापारी शेतकरी वाहतूक व्यवसायिक राजकीय व सामाजिक एक वारसा असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या अतुल सावे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्यात उडी घेतली. प्रतिकुल परिस्थितीत अतुल सावे यांनी आपला जनसंपर्क वाढवला. भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये अतुल सावे यांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच 2014 सली त्यांना भारतीय जनता पक्ष औरंगाबाद औरंगाबाद पूर्व मतदार संघात तिकीट देऊन निवडून आणले. सावे परिवार आणि औरंगाबादचे नाते हे परिसरातील लोकांना सांगायला नको. मात्र पालघर पासून चारशे साडेचारशे किलोमीटर लांब अंतरावर राहूनही सावे परिवाराने आपले जन्मगाव व आपला समाज सोडलेला नाही. पालघर जिल्ह्यातील वसई ते बोर्डी पर्यंत विविध सामाजिक संस्था वाचनालय महिला मंडळ शैक्षणिक संस्था यांच्या या विकासात सावे कुटुंबीयांचे योगदान मोठे आहेत. अतुल सावे औरंगाबाद प्रमाणेच पालघर जिल्ह्यातील विविध समाजातल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन विधिमंडळात चर्चा घडवून आणली आहे. 

loading image
go to top