हॅपी स्ट्रीट मध्ये खेळाचा मोह खासदारांना देखील आवरला नाही...

पोलिसांच्या बॉलिंग वर खासदार शिंदे यांची बॅटिंग
Shrikant Shinde
Shrikant Shinde

डोंबिवली - कल्याण पोलीस परिमंडळ 3 च्या पुढाकाराने आणि कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली शहरामध्ये दर रविवारी हॅपी_स्ट्रीट हा उपक्रम राबविला जात आहे. कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर नागरिकांचे मानसिक स्वास्थ सुधारावे आणि नेहमीच्या दैनंदिन जीवनातून त्यांनी थोडा वेळ काढून मनसोक्त आनंद लुटावा याकरिता पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची मोह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देखील आवरला नाही, रविवारी त्यांनी यात सहभागी होत क्रिकेट सामना खेळत पोलिसांच्या बॉलिंगवर मनसोक्त फटकेबाजी केली.

नागरिकांनी रविवारी घरातून बाहेर पडून रस्त्यावर उतरत नृत्य, खेळ, योगा आणि संगीताच्या साथीने निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी. त्यांचे स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे हा उपक्रम आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य लाभत आहे. नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होत धम्माल-मस्ती, खेळ, जॉगिंग, डांस, संगीतातून गाणे, लहान मुलांसाठी क्रिकेट, फटबॉल, बॉलिवूड डान्स, एसडी डान्स, लाइव्ह झुम्बा सेशन्स तसेच तायक्वांदो, स्व-संरक्षण, किकबॉक्सिंग आणि कराटे, तर क्ले मॉडेलिंग, क्ले पेंट आणि क्ले पॉटरी याचा आनंद घेत आहेत.

रविवारी कल्याण येथे पार पडलेल्या या उपक्रमात खासदार शिंदे हे देखील सहभागी झाले होते. पोलीस नागरिकांसोबत त्यांनी क्रिकेट खेळाचा आनंद यावेळी लुटला. शहरात कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी आणि समाजस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सतत झटणाऱ्या पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत अश्या प्रकरचा आनंदमेळा सुरु केल्याबद्दल त्यांनी कौतुक करत, हा उपक्रम इतर शहरात देखील राबविण्यात यावा अशी इच्छा यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com