हापूस आला रे... दीड ते दोन हजारांचा भाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

ऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे. 

हापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा तर हे फळ जीव की प्राण. त्यामुळेच पावसाळा सरल्यानंतर अशा प्रेमींना त्याची प्रतीक्षा असते. ती आता संपणार असून, पोटे यांच्याकडे पहिली पेटी पोहचली आहे.

पावसामुळे गळणाऱ्या मोहोराची काळजी घेतल्यास लवकर आंबे लागतात; परंतु खरा हंगाम मार्चपासून सुरू होईल. तोपर्यंत तुरळक येणाऱ्या हापूस आंब्यांचा भाव डझनाला 1500 ते 2000 राहील, अशी माहिती बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली. 

Web Title: Hapus mango enter in market