हापूस आंब्याची बाजारात घसघशीत आवक

हापूस आंब्याची बाजारात घसघशीत आवक

नवी मुंबई - आपल्या गोडीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोकणच्या हापूस आंब्याची नवी मुंबईतील घाऊक बाजारात घसघशीत आवक झाली. हापूस आंब्याच्या तब्बल ८५० पेट्या सोमवारी येथील बाजारात दाखल झाल्या. जानेवारीतील हापूस आंब्याची ही उच्चांकी आवक असून, गेल्या ५० वर्षांतील हा विक्रम असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी देवगड आणि रत्नागिरीतून तब्बल ६०० हापूसच्या पेट्या दाखल झाल्या. तर, कर्नाटकातून २५० हापूस आंब्याच्या पेट्या आल्या आहेत. कोकणातल्या हापूसचे दर एका पेटीमागे (४ ते ६ डझन) २ ते ५ हजार रुपये असून, कर्नाटकच्या आंब्याचे दर किलो मागे २०० ते ३०० रुपये इतके आहेत.  एरव्ही कोकणातला हापूस आंबा मार्च किंवा एप्रिलमध्ये बाजारात दाखल होतो. गेल्या वर्षी ओखी वादळामुळे हापूसचे आगमन लांबले होते. यंदा मात्र वातावरणातील गारठा वाढून हापूसला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आंब्याच्या मोहोराला चांगली फळधारणा झाली. त्यामुळे जानेवारीतच मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. कोकणातील हापूस बाजारात येण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा आंबा दाखल झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com