टिटवाळ्यात अल्पवयीन मुलावर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

दुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रघू भारद्वाज याला अटक केली.

उल्हासनगर - दुचाकीवर फिरवण्याच्या बहाण्याने एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रघू भारद्वाज याला अटक केली.

रघूने 15 वर्षीय मुलाला दुचाकीवर बसवून टिटवाळा येथील डोंगरावर नेले आणि लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलाने घरच्यांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रघूवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: harassment of a minor child in ulhasnagar