JNPT मध्ये 27 हजार कोटींची गुंतवणूक, व्यापाराच्या मोठ्या संधी होणार खुल्या

JNPT मध्ये 27 हजार कोटींची गुंतवणूक, व्यापाराच्या मोठ्या संधी होणार खुल्या

नवी मुंबई, ता. 24 : कोरोनामुळे अर्थचक्रावर परिणाम झाला असताना जेएनपीटी बंदरात तब्बल 27 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी गुंतवणूकदारांशी 30 सामंजस्य करारावर जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सामंजस्य करारामुळे रोजगाराला संधी निर्माण होतील. आयात-निर्यात व्यापारास लाभ होतील. भारत आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टीवरील व्यापाराच्या संधीही खुल्या होतील, असे सेठी म्हणाले.

करारावर स्वाक्षरी करताना जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. 2 ते 4 मार्च 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या इंडिया समिट 2021 च्या पार्श्‍वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी करार केला. 

भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस चालना देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या पुढाकारातून मार्च 2021 मध्ये 'मेरीटाइम इंडिया समिट 2021'चे आयोजन करण्यात आले आहे. 2 ते 4 मार्च 2021 दरम्यान ऑनलाईन होणाऱ्या समिटमध्ये तीनदिवसीय शिखर संमेलन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमआयएस 2021 चे उद्‌घाटन होणार आहे.

केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय आणि फिक्की (एफआयसीसीआय) औद्योगिक भागीदार व ईवाय ज्ञान भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात 24 सहयोगी देश सहभागी होतील. 400 हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन होईल. 

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे पहिल्या सत्राचे जागतिक दर्जाच्या बंदरांचे विकास संयोजक असतील. या सत्रात ते मोठ्या बंदरांचा विकास, 'स्मार्ट बंदरे' विकसित करण्याचे महत्व व बंदरे आणि टर्मिनल्सच्या डिजिटलायझेशनचा प्रभाव-एआय, फाईव्ह जी टेक्‍नोलॉजीमुळे होणारे बदल, नवीन मॉडेल : पीपीपी आणि लॅण्डलॉर्ड मॉडेलवर भर देतील. जेएनपीटीचे उपाध्यक्ष वाघ "महाष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी' विषयावरील संयोजक असतील. त्यामध्ये ते जेएनपीटी सेझमधील गुंतवणुकीच्या संधींवर प्रकाश टाकतील. 

करार झालेल्या कंपन्या 

डीपी वर्ल्ड, जेएम बक्‍शी ऍण्ड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआईटीआईई, एसएस जी फार्मा प्रा. लि., सूरज ऍग्रो, जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा. लि., सिनलाईन इंडिया लिमिटेड आदी प्रमुख कंपन्यांनी जेएनपीटीसोबत करार केला आहे. त्यांना जेएनपीटीमार्फत मॅन्युफॅक्‍चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअर हाऊसिंग/कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्‍शनरी मॅन्युफॅक्‍चरिंग, अभियांत्रिकी सेवा आणि फूड प्रोसेसिंगसंबंधीच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. 

याबाबत बोलताना JNPT चे अध्यक्ष संजय सेठी म्हणालेत की, इंडिया समिटमध्ये आम्ही विविध कंपन्यांसमवेत 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जेएनपीटीला यामुळे देशातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. जेएनपीटीमध्ये 27 हजार कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. हे सामंजस्य करार केल्याने रोजगाराला संधी निर्माण होतील. आयात-निर्यात व्यापारास लाभ होतील. भारत आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टीवरील व्यापाराच्या संधीही खुल्या होतील.

harbor business development MOU sighed with 30 companies investment worth 27 crore 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com