रुळाला तडे गेल्याने हार्बर विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कामोठे - हार्बर रेल्वे मार्गावरील खांदेश्‍वर रेल्वेस्थानकाजवळील रुळाला बुधवारी सकाळी तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी सेवा काही काळासाठी विस्कळित झाली होती. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा खोळंबा झाल्याने कामावर जाणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली.

खांदेश्‍वर रेल्वेस्थानकातून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोलीमधील हजारो नागरिक प्रवास करतात. त्यामुळे सकाळपासूनच या स्थानकात प्रवाशांची गर्दी असते. बुधवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खांदेश्‍वर रेल्वेस्थानकाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुळाला तडे गेल्याने या मार्गावरील प्रवासी सेवा प्रभावित झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सायन-पनवेल महामार्गावरून मिळेल त्या वाहनांनी प्रवास केला. काहीजणांनी घरी जाणे पसंत केले.

Web Title: Harbour line disrupting rail cracks