हार्बर, पश्‍चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - रुळांची देखभाल व दुरुस्तीसाठी हार्बर व पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी (ता. 12) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ब्लॉक नसेल.

हार्बर रेल्वे
- कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वा.पर्यंत ब्लॉक

- या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 वाजेपर्यंत बंद असेल.
- पनवेल ते सीएसटीदरम्यानची लोकल सेवा सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत बंद राहील.
- या मार्गावर सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.

पश्‍चिम रेल्वे
- गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी 10. 35 वा. ते दुपारी 2.35 वाजेपर्यंत ब्लॉक.
- या कालावधीत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून धावतील.
- काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Web Title: harbour western railway mega block