Mumbai News : सामाजिक-सांस्कृतिक परिघात मूळ विचार लक्षात ठेवण्याची गरज; प्रा. हरीश वानखेडे

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्रा. हरीश वानखेडे यांचे प्रतिपादन
Harish Wankhede statement need to remember original thought socio-cultural context
Harish Wankhede statement need to remember original thought socio-cultural contextsakal

मुंबई : अलीकडच्या काळात आंबेडकरी विचारांना हिंदुवाद्यांचे कडवे आव्हान दिले जात आहे. परंतु त्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक परिघात हे विचार अजूनही ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आपले मूळ विचार लक्षात कायम लक्षात ठेवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज प्रा. हरीश वानखेडे यांनी आज मुंबईत केले.

मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठतर्फे विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जे. पी. नाईक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या “ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक धोरणे आणि सामंतीकरणवादी धोरणे" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते,

त्यावेळी ते या चर्चा सत्राच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. मनीषा करणे यांनी या राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन यामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच आपल्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रम आदींची माहिती यावेळी दिली.

तर म्हणाले की, समकालीन महाराष्ट्राच्या दलित आंदोलनात पाच विशिष्ट प्रवृत्ती दिसून येतात, त्या म्हणजे वाढलेला उग्रतावाद, उप-जातींचे राजकारण, दलित मध्यमवर्गाचे आंदोलन, सार्वजनिक प्रतीकांचे राजकारण आणि दलितांतील हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रभाव फिरण्याचा वेग. आदी प्रवृत्ती आहेत. या राजकीय जनजागृतीतून नाही, परंतु प्रामुख्याने सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेल्या दिसतात.

आपल्याकडे सीमांतीकरण आणि समावेशाच्या कल्पना या ग्रीक तत्त्वज्ञानाइतक्याच जुन्या आहेत, जरी शतकानुशतके विचारवंत आणि समाजांनी त्यांना प्रभावीपणे एकत्रित करण्याचे अनेक प्रयत्न केले. समाजांमध्ये नेहमीच बहुवचन मते, संस्कृती आणि गट असतात हे लक्षात घेता, विविधतेला लोकशाही पद्धतीने गुंतवून ठेवले पाहिजे.

तथापि, यामुळे बहुसंख्याकांच्या जोरावर खंडित सामूहिकता मागे सोडून एकरुपतेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे एकताही महत्त्वाची असल्याचे प्रा. वानखेडे म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. कांचना महादेवन यांनी स्त्रीवादी राजकारण आणि चळवळींशी संबंध असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्य प्रवाहातील भारतीय स्त्रीवादाच्या दलित स्त्रीवादी समीक्षेने एकसंध ओळखींच्या अडचणी सांगितल्या आहेत ज्या अनेकदा जातीय वर्चस्वाला मुखवटा घालतात. असेही त्या म्हणाल्या.

दुपारच्या सत्रात शिक्षण तज्ज्ञ शीतल कांबळे म्हणाल्या, शिक्षणामध्ये जाती, वर्ग आणि त्याविषयी संवेदना हव्यात. महात्मा फुले यांनी ते अधोरेखित केलं होते. सरकारी शाळा बंद केल्या जात असताना दुसरीकडे काही वर्गाला शिक्षण मिळत नाही तर साक्षर होत नाहीत हे वास्तव आहेत.धोरण राबवण्यापेक्षा त्यावरील निधी कमी करा, असे धोरण राबवले जात आहे. शिक्षणाचा एकूण प्रवास हा खाजगीकरणाच्या मार्गाने नेला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com