हर्षद मेहता घोटाळा प्रकरण, 26 वर्षांनंतर 10 आरोपींची सुटका 

हर्षद मेहता घोटाळा प्रकरण, 26 वर्षांनंतर 10 आरोपींची सुटका 

मुंबई : हर्षद मेहता याने शेअर बाजारात केलेल्या घोटाळ्याप्रकरणी तब्बल 26 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सात; तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्‌स लिमिटेडच्या (एसबीआय कॅप्स) तीन अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका केली. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), सिक्‍युरिटी ऍण्ड फ्रॉड विभाग, एसबी या अधिकाऱ्यांवरील आरोप सिद्ध करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी त्यांची निर्दोष सुटका केली. 

मुख्य आरोपी रामा सीतारामन आणि सी. रविकुमार आणि मेहता हे या गैरव्यवहाराचे सूत्रधार असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. सीबीआय कॅप्सला 105 कोटींचा गंडा घालण्यासाठी त्यांनी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 1991-92 मध्ये समभाग खरेदी-विक्रीत हा गैरप्रकार करण्यात आला होता. एसबीआय कॅप्सचे जनार्दन बंडोपाध्याय यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. त्यासाठी 24 आर्थिक व्यवहार (ट्रान्झॅक्‍शन)चे पुरावे सीबीआयने न्यायालयात सादर केले होते; परंतु पुढील तपासात या गैरव्यवहारात आणखी बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड होत असल्याने बंडोपाध्याय यांच्यासह एसबीआय कॅप्सच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com