
Hasan Mushrif News: मुश्रीफांच्या मागण्या ईडीकडून मान्य! चौकशीबाबत घेतला मोठा निर्णय
Latest Marathi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. यावेळी मुश्रीफ यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार त्यांच्या चौकशीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जात आहे. (Hasan Mushrif demands accepted by ED officials Video recording of investigation is going on)
हसन मुश्रीफ यांच्या वकिलांच्या माहितीनुसार, मुश्रीफांनी आज ईडी कार्यालयात दाखल होताच चौकशी अधिकाऱ्यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या.
या मागण्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या आहेत. त्यानुसार आता मुश्रीफांची चौकशी होत असताना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत.
हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
मुश्रीफांनी केल्या होत्या 'या' मागण्या
मुश्रीफांनी पत्राद्वारे मागणी केली होती की, कायद्याच्या तरतुदीनुसार माझी चौकशी सुरु असताना आपल्या विधानांची ऑडिओ/व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावं.
तसेच स्टेटमेंट रेकॉर्ड होत असताना आपले वकील अजित सोनी आणि प्रशांत पाटील यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुश्रीफांकडून करण्यात आली आहे.