पालघर येथे हत्तीरोग प्रतिबंधात्मक सामुदायिक औषधोपचार मोहीम

अच्युत पाटील
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

डहाणू, पालघर, वसई, वाडा व विक्रमगड या पाच तालुक्यातील 2 वर्ष वरील सर्व लाभार्थींना (गरोदर माता व गंभीर आजारी सोडून) डी. ई. सी. व अलबंडाझोल या गोळ्यांची मात्रा वयाप्रमाणे खाऊ घालणे व त्यातून हत्तीरोग निर्मूलनास हातभार लावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

बोर्डी - जि. प. प्राथमिक शाळा, घोलवड येथे मा. श्री. विजय खरपडे, अध्यक्ष, जि. प. पालघर यांच्या हस्ते हत्तीरोग प्रतिबंधात्मक 'सामुदायिक औषधोपचार मोहीम' चा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद यांनी 'अध्यक्ष या नात्याने मी गोळी खाल्ली तर पालघर जिल्हा हत्तीरोग पासून सुरक्षित राहील' या जबाबदारीच्या भावनेतून स्वतः गोळी खाऊन या मोहिमेची सुरवात केली व सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक तसेच पालघर जिल्ह्यातील सर्वांनी ही गोळी खाण्यासाठी आवाहन केले.

उपस्थित मा. श्री. प्रशांत पाटील, सदस्य, पंचायत समिती डहाणू व मा. श्रीमती राजश्री कोल, सरपंच, ग्रा. पं. घोलवड यांनी सुध्दा स्वतः गोळी खाऊन मोहिमेस शुभेच्छा दिल्या. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर व मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन दिनांक 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार करण्यात आले आहे. डहाणू, पालघर, वसई, वाडा व विक्रमगड या पाच तालुक्यातील 2 वर्ष वरील सर्व लाभार्थींना (गरोदर माता व गंभीर आजारी सोडून) डी. ई. सी. व अलबंडाझोल या गोळ्यांची मात्रा वयाप्रमाणे खाऊ घालणे व त्यातून हत्तीरोग निर्मूलनास हातभार लावणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

डॉ. सागर पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी पालघर यांनी हत्तीरोग व त्याच्या निर्मूलनासाठी गोळी 100% जनतेने खाण्याची गरज याबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमास डॉ. गाडेकर, डॉ स्मिता बारी, प्रा आ केंद्र घोलवड येथील आरोग्य कर्मचारी, जि. प. प्राथमिक शाळा घोलवड  येथील मुख्याध्यापक व इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील मुलांना गोळ्या खाऊ घालण्यास सुरवात करून पालघर जिल्यातील हत्तीरोग प्रतिबंधात्मक सामुदायिक औषधोपर मोहिमेचा शुभा व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील मुलांना गोळ्या खाऊ घालण्यास सुरवात करून पालघर जिल्यातील हत्तीरोग प्रतिबंधात्मक सामुदायिक औषधोपर मोहिमेचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला.

Web Title: Hattirog preventative medication campaign at Palghar