उल्हासनगरमधील हवा घातक

दिनेश गोगी
सोमवार, 14 जानेवारी 2019

उल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या अहवालामध्ये ठेवला आहे. मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देशातील १०२ शहरांची नॅशनल क्‍लीन एअर प्रोग्रामांतर्गत यादी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर या १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत. या शहरांनी प्रदूषणावर मात करणारा विशेष कृती कार्यक्रम सादर केलेला नाही. विशेषतः या १७ शहरांपैकी उल्हासनगरसह बदलापूर आणि पुणे या तीन शहरांचे नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उल्हासनगरात दोन डंपिंग ग्राऊंड असून त्याच्या धुरासोबत धूळ तसेच हवा प्रदूषण अधिक अाहे.  
-डी. बी. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी

Web Title: Hazardous air in Ulhasnagar