हजारेंच्या विरोधात "राष्ट्रवादी'चे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शुक्रवारी राज्यभरात आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. सहकारी साखर कारखाना खरेदीप्रकरणी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा प्रयत्न हजारे यांनी केला. या खरेदी व्यवहाराची "सीबीआय' चौकशी करण्याचीही मागणी केली होती. 

मात्र, अण्णा हजारे यांची मागणी पूर्णतः राजकीय आहे. कोणत्याही साखर कारखाना खरेदीत सहभाग नसताना शरद पवार यांना केवळ बदनामी करण्याच्या हेतूने हे आरोप होत असल्याचा दावा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने केला. याविरोधात 23 जिल्ह्यांत अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, बीड, लातूर, परभणी, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांत कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. 

Web Title: Hazare's movement against the ncp