बाईकच्या हप्त्यांसाठी संघवींची हत्या

Siddarth Singhvi
Siddarth Singhvi

मुंबई : कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात सिद्धार्थ संघवी यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली 20 वर्षीय आरोपी रईस उर्फ सर्फराज शेख याने सोमवारी दिल्याचा दावा पोलिसांनी केला. एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष असलेल्या संघवींची कार नवी मुंबईतील कोपरखैरणेत आढळून आल्याने गूढ निर्माण झाले होते.

न्यायालयाने सर्फराजला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संघवी बेपत्ता असल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आल्यावर त्यांचे कुटुंबीय पोलिसांची मदत घेतील, अशी भीती सर्फराजला वाटली. हे प्रकरण निवळण्यासाठी त्याने संघवी यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून त्यात दुसरे सिमकार्ड टाकले. त्यावरून संघवी कुटुंबीयांना "सिद्धार्थ सर सुखरूप आहेत, काळजी करण्याची गरज नाही' असे सांगून फोन कट केला. नेमका याच फोनमुळे सर्फराज पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी हस्तगत केलेल्या संघवी यांच्या गाडीवरही सर्फराजच्या हाताचे ठसे, रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती परिमंडळ-3 चे उपायुक्त अभिनाश कुमार यांनी दिली.
मूळचा नवी मुंबईचा रहिवासी असलेला सर्फराज हा संघवी यांचे कार्यालय असलेल्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीकाम करायचा. तेथील वाहनतळावर दोघांची तोंडओळख झाली होती.

हत्या आणि पळ
एचडीएफसीच्या पार्किंगमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच सुरक्षा रक्षक वाहनांच्या नोंदी ठेवतो. तेथे सीसी टीव्ही नाहीत. ही संधी साधून सर्फराजने 5 सप्टेंबर रोजी संघवी यांना पार्किंग परिसरात रात्री 8 च्या सुमारास गाठले. चाकूच्या धाकाने पैसे मागितल्यानंतर त्यांनी उलट पोलिसांची भीती दाखवली. सर्फराजने हल्ला करून संघवींचा गळा चिरला. संघवी यांचा फोन बंद केला. मृतदेह त्यांच्याच गाडीतून कल्याणच्या हाजीमलंग रोडवरील काकडवाला गावाजवळील नाल्यात फेकला. तेथून गाडी कोपरखैरणेत पार्किंगमध्ये लावून सर्फराजने घरी पळ काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com