""तो' पोलिस साक्षीदार ठरू शकत नाही'' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - शीना बोरा खून खटल्यात माफीच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवणारा पोलिस अधिकारी स्वतंत्र साक्षीदार ठरू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. यामुळे या खटल्यातील आरोपी पीटर व इंद्राणी मुखर्जीला दिलासा मिळाला आहे. 

या खटल्यात "सीबीआय'ने मुखर्जीचा वाहनचालक; तसेच या खुनात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या श्‍यामवर रायला माफीचा साक्षीदार केला आहे. त्याचा जबाब नोंदवणारे पोलिस निरीक्षक गणेश दळवी यांचाही उल्लेख साक्षीदार म्हणून केला आहे; मात्र हत्येबाबत जबाब नोंदवला म्हणून दळवी स्वतंत्र साक्षीदार होऊ शकत नाहीत. त्यांनी केवळ रायकडील माहिती घेतली, असे मत न्या. साधना जाधव यांनी व्यक्त केले. 

रायला पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणात अटक केली होती. तपासादरम्यान त्याने शीनाच्या खुनाचीही कबुली दिली होती. पीटर व इंद्राणीने त्याच्या जबाबाला विरोध केला आहे. शीना बोरा खून खटल्याचा प्रारंभ पुन्हा करण्याचे निर्देशही न्यायालयाने अभियोग पक्षाला दिले आहेत. शीनाचा खून तिची आई इंद्राणीने केल्याचा "सीबीआय'चा आरोप आहे.

Web Title: He could not be a witness to the police