किरकोळ भांडणातून त्याने केली पत्नीची हत्या

किरकोळ भांडणातून त्याने केली पत्नीची हत्या
किरकोळ भांडणातून त्याने केली पत्नीची हत्या

नवी मुंबई : उरणच्या डाऊरनगर भागात राहणाऱ्या पूजा सरगर (२५) या विवाहितेची पतीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. उरण पोलिसांनी पती शंकर सरगर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. 

मृत पूजा ही उरणच्या डाऊरनगर भागात, पती शंकर सरगर याच्यासोबत राहत होती. गत १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शंकर आणि पूजा या पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने शंकरने पूजाला मारहाण करून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूजा अत्यवस्थ होऊन बेशुद्धावस्थेत गेल्याने, तिला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याने पूजाच्या आईलादेखील, आत्महत्येचे कारण सांगून तिला रुग्णालयात बोलावून घेतले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान पूजा बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना तिचा जबाब नोंदविता आला नाही. त्यानंतर २५ दिवस बेशुद्धावस्थेत असलेल्या पूजाचा १२ सप्टेंबर रोजी अखेर एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उरण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनात पूजाच्या गळ्यावर नखांचे ओरखडे व तिचा गळा आवळण्यात आल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे तिचा गळा आवळण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उरण पोलिसांनी पूजाचा पती शंकर सरगर याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शंकर होनमाने यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com