दोन्ही हात नसताना बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

राज्यभरात विधानसभा निवडणूकीचे मतदान सकाळपासून पार पडत असून यावेळी अनेकांनी कठीण परिस्थितीवर मात करत मतदानाचा हक्क बजावला.

ठाणे : राज्यभरात विधानसभा निवडणूकीचे मतदान सकाळपासून पार पडत असून यावेळी अनेकांनी कठीण परिस्थितीवर मात करत मतदानाचा हक्क बजावला यात अनेक जेष्ठांसह रोगाने ग्रासलेल्यां व्यक्तींचा समावेश होता. मात्र या सर्वांत ठाण्यातील एका व्यक्तीने दोन्ही हात नसताना देखील मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.

जाधव वाघेला असे या जेष्ठ नागरिकाचे नाव असून त्यांनी ठाणे शहर विधानसबा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he voted without both hands