रुबेलावरून मुख्याध्यापकांची कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मुंबई - रुबेला लसीकरण ऐच्छिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत असताना नोडल अधिकाऱ्यांनी मात्र शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबतचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले आहेत. शहरातील काही पालक लसीकरण ऐच्छिक असल्याचे सांगत पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याने शाळेत 100 टक्के उपस्थिती कशी दाखवायची, अशा कोंडीत मुख्याध्यापक अडकले आहेत. 

रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शहरातील काही पालक या मोहिमेपासून काही कारणे सांगत मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे मुख्याध्यापकांना अशा पालकांची मने कशी वळावायची? हा प्रश्‍न पडला आहे. यातच या मोहिमेच्या नोडल अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या दिवशी शाळांमध्ये 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल, याबाबत दक्षता घेण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली आहे. 

मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले तरीही शाळांत 100 टक्के विद्यार्थी उपस्थिती दाखवणे शक्‍य नाही. शिक्षक वेळप्रसंगी मुलांच्या घरीही जात आहेत; मात्र लसीकरणासाठी पालक तयार होत नाहीत. अशा पालकांच्या पाल्यांना त्यांच्या डॉक्‍टरांमार्फत लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास ही योजना यशस्वी होईल. 
- प्रशांत रेडिज, सचिव, मुख्याधापक संघटना 

Web Title: Headmaster confuse to rubella