आला उन्हाळा आरोग्य सांभाळा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - भारतीय हवामान खात्याने यंदा उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असेल, असा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्‍वभूमीवर उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. 

उष्णाघातामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेणे, जागोजागी पाणपोई उभारणे, उन्हापासून संरक्षणासाठी रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी शेड उभारणे, जिल्हा नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष, स्थानिक संस्था व आरोग्य विभागाने एकत्रित कार्य करणे, उष्माघातापासून बचावाबाबत जनजागृती कार्यक्रम घेणे आदी सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Health care