जेजे महानगर रक्तकेंद्रासाठी दोन आधुनिक वाहनांचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जेजे महानगर रक्तकेंद्रासाठी दोन आधुनिक वाहनांचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:  सर जेजे महानगर रक्तकेंद्रासाठी रक्तसंकलनाकरिता दोन वातानुकुलीत वाहन देण्यात आले.  त्यांचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक वाहनांमुळे कमी जागेत आणि गृहनिर्माण संकुलांमध्ये जाऊन रक्तसंकलन करणे शक्य होणार आहे.

रक्तसंकलन करणारी ही वाहने वातानुकुलीत असल्याने रक्तदात्यांना रक्तदानाच्या वेळेस त्रास होणार नाही. सर जेजे. महानगर रक्तसंकलन केंद्र हे मुंबईतील सर्वात जास्त करणारे रक्तसंकलन करणारे असून वार्षिक 30 हजार युनिट्स संकलन करत असून 24 तास सुरू असणारे हे एकमेव केंद्र आहे.

कोरोना काळात या वाहनांचा उपयोग करून जास्तीत जास्त रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मदत करावी तसेच नागरिकांनी देखील रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. 

यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. अरूण थोरात, रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे आदी उपस्थित होते.

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Health Minister inaugurates two modern vehicles JJ Mahanagar Blood Center

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com