राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळतेय. इंग्लंडसोबतच युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला. अत्यंत कठोर निर्बंध अनेक देशांमध्ये लादले गेले आहेत. अशात भारतात हिवाळ्याची सुरवात होणार आहे. भारतात आणि मुख्यत्त्वे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार का ? याबाबत अनेकांच्या मनात चिंता आणि भीती आहे. या बाबतीत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे, तरीही महाराष्ट्र राज्य सरकारची कोरोना बाबतीत संपूर्ण तयारी आहे अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.  

काय म्हणालेत राजेश टोपे : 

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण शेवटी ती 'शक्यता' आहे. आता दिवाळी तोंडावर आहे. अशात अनेक लोकं बाजारात शॉपिंगसाठी जातायत, घराबाहेर पडतायत. अशात माझं सांगणं एकच आहे की, हे सर्व करावं, पण हे सर्व करत असताना काळजी घेतच सर्व करावं अशी अपेक्षा आणि सूचना मी करू इच्छितो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत.   

मंदिरांबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली, सातत्याने राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी होत आहे. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या निर्णय दिवाळीनंतर चर्चा करून घेतील, असंही राजेश टोपे म्हणालेत. 

health minister of maharashtra rajesh tope on second wave of covid in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com