'डॉक्टर्स डे' निमित्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं सर्व डॉक्टरांसाठी भावनिक पत्र...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ  भारतात दरवर्षी १ जुलै रोजी 'डॉक्टर्स डे' साजरा केला जातो

मुंबई : जगभरात कोरोनाचं संकट कमी होण्याचं नाव नाही. भारतात आता कोरोनाने कहर करण्यास सुरवात केलीये. कधी पंधरा तर कधी १९ हजारांच्यावर असा दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहायला मिळतोय.  मुंबई पुण्यात देखील कोरोना रुग्ण वाढतायत. अशात आपल्यासाठी चोविस तास झटतायत आपले डॉक्टर्स आणि आज डॉक्टरांचा दिवस म्हणजेच जागतिक डॉक्टर्स डे. या निमित्ताने महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांसाठी एक खास ट्विट केलंय. या ट्विटच्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना सलाम केलाय. 

BIG NEWS - 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान

राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट : 

"रुग्णसेवेचं अखंड व्रत घेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांच्या रूपातील सर्व समर्पित डॉक्टरांना #doctorsday च्या खूप खूप शुभेच्छा..!" असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. सोबत राजेश टोपे राजेश टोपे यांनी एक पत्र देखील शेअर केलंय. त्यात राजेश टोपे म्हणतात, डॉक्टर आज तुमचा दिवस आहे. देवाचा कोणता एक दिवस असू शकत नाही. आज कोरोनाने साऱ्या जगाला विळखा घातलाय. अशात सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत, या परिस्थितीत तुमच्या रूपाने सर्वांना देव दिसतोय. तुम्ही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहेत. त्यामुळे तुमचे मानावे तेवढे आभार कमी. असं राजेश टोपे म्हणतायत. 

अत्यंत महत्त्वाची माहिती ! नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे थंडीचा काळ, थंडीत कोरोना पुन्हा वाढणार? तज्ज्ञ सांगतायत...

राजेश टोपेंनी शेअर केला खास व्हिडीओ : 

आज डॉक्टर्स डे निमित्त खुप साऱ्या शुभेच्छा !तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये.कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत.कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स,नर्स, सफाईकर्मचारी,पोलीस,मिडीयाप्रतिनिधी, यांनी जे कर्तव्य बजावलय ते अतुलनीय आहे. एक सलाम सैनिकांना!! एक कोरोना वॉरिअर्सना !! 

BIG NEWS - आता वीजबिल भरा एकरकमी आणि मिळवा 'इतकी' सवलत; वाचा तुमच्या फायद्याची बातमी.. 

डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ  भारतात दरवर्षी १ जुलै रोजी 'डॉक्टर्स डे' साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या महामारीमुळे डॉक्टरांचं महत्त्व आणखीन अधोरेखित झालंय. सर्व डॉक्टरांना 'डॉक्टर्स डे'च्या शुभेच्छा. 

health minister rajesh topes emotional letter to all doctors on doctors day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health minister rajesh topes emotional letter to all doctors on doctors day