स्थूलपणामुळे आरोग्याला धोका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

बेलापूर  - ओबिसिटी म्हणजेच लठ्ठपणा हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयाचे विकार आणि कॅन्सरसारखे आजार उद्‌भवू शकतात. आज जगभरात सुमारे 1.5 अब्ज नागरिकांना लठ्ठपणा असून भारतात त्यांची संख्या साधारण तीन कोटी आहे, अशी माहिती ओबिसिटी आणि बॅरिआट्रिकचे युरोपमधील तज्ज्ञ डॉ. विग्यान जैन यांनी दिली. अपोलो रुग्णालयात मंगळवारी (ता. 31) ओबिसिटी व बॅरिआट्रिक सर्जरीचा शुभारंभ झाला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. 

शरीरात अत्याधिक प्रमाणात मेद साचल्याने ओबिसिटीची समस्या निर्माण होते. त्याचे मापन बॉडी मास इंडेक्‍सने (बीएमआय) केले जाते. हे वजन व उंची यांचे गुणोत्तर असते. त्यातून शरीरातील मेदाचे प्रमाण स्पष्ट होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते निरोगी बीएमआय 18.5 व 24.9 दरम्यान असतो. 25 ते 29.9 दरम्यानचा बीएमआय ओव्हरवेट श्रेणीत मोडतो. बीएमआय 30 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा चिंता निर्माण होते. बैठी जीवनशैली, कार्बोहायड्रेट अत्याधिक असलेल्या व तेलकट पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन यामुळे भारतीयांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे, असे डॉ. जैन यांनी सांगितले. अपोलो हॉस्पिटलमधील ओबिसिटी व बॅरिआट्रिक सर्जरी कार्यक्रमात ही समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपोलो रुग्णालयाचे कन्सल्टंट, फिजिशिअन डॉ. संजय खरे यांनी सांगितले, की दीड वर्षात रुग्णालयात 15 हजार 234 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक प्रौढांमध्ये लठ्ठपणा आढळला. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 42 टक्के प्रौढांचा बीएमआय त्यांना ओबिस श्रेणीमध्ये समाविष्ट करणारा आहे. या कार्यक्रमाला रुग्णालयाचे डॉ. नरेंद्र त्रिवेदी, डॉ. संतोष मराठे आदी उपस्थित होते. 

डायबिटीस, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार व स्ट्रोक, कॅन्सर, फॅटी लिव्हर डिसीज, ऑस्टिओअर्थ्रायटिस व किडनीचे विकार अशा आजारांसाठी लठ्ठपणा धोकादायक आहे. त्यामुळे त्याच्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. 
- डॉ. संजय खरे, कन्सल्टंट, फिजिशिअन, अपोलो रुग्णालय 

बीएमआयचे प्रमाण 
निरोगी - 18.5 ते 24.9 
ओव्हरवेट - 25 ते 29.9 
ओबिस श्रेणी - 30 व अधिक 

Web Title: Health risk due to obesity