मुंबई : आरोग्य सेविकांकडून प्रशासनाला दोन महिन्यांची मुदत; दिला 'हा' इशारा

मागण्या मान्य न झाल्यास 8 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा
 Strike
StrikeSakal media

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संपावर गेलेल्या 4000 आरोग्य सेविकांनी पालिका प्रशासनाला (BMC) दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या आरोग्य सेविकांच्या मागण्या मान्य न झाल्यास 8 मार्च महिला दिनापासून बेमुदत संपाचा (indefinite strike) इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील 4 हजार आरोग्य सेविकांनी (health workers) एकदिवसीय काम बंद केले होते.  पण, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे, आता आरोग्य सेविकांच्या संघटनांनी बेमुदत संपावर जायचा निर्णय घेतला आहे. (Health workers gives indefinite strike warning to bmc on demands issue)

 Strike
राज्यात लवकरच रात्रशाळेसाठी नवे धोरण; शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

महापालिकेत आरोग्य सेविकांनी कोविड काळात मोलाची भुमिका बजावली असली तरी आज त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य सेविकांनी जीवाची पर्वा न करता दोन वर्ष मुंंबईकरांच्या आरोग्याच्या अडचणी सोडवणे, तसेच घरोघरी जाऊन माहिती देण्याचे काम या आरोग्य सेविकांनी केले.

मात्र केंद्र आणि राज्य सरकार केलेले कायदे महापालिका पायदळी तुडवत असून मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारला इशारा देण्यासाठी हा एक दिवसीय संप केला होता पण आजच्या संपानंतर ही सरकारने लक्ष दिले नाही तरीही आम्ही दोन महिन्यांची मुदत दिली आहे. मुदती पूर्वी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर 8 मार्च महिन्यापासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश देवदास यांनी दिली.

काय आहेत मागण्या ?

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 2015 पासून किमान वेतन, प्रोविडंट फंड देण्यात यावा, 65 वर्षानंतर निवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये पेंशन व उपदान त्वरीत देण्यात यावे. सध्या सेवेत असलेल्या आरोग्य सेवी कर्मचार्यांना प्रसूती रजा व इतर रजा देण्यात याव्यात, 300 रुपये कोविड भत्ता देण्यात यावा, 5 लाखाची गट विमा योजना, 2016 ला भरती झालेल्या आरोग्य सेविकांना भाऊबीज भेटीची थकबाकी द्यावी तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 2000 साला पासूनचे 600 रुपये सर्व सी एच व्हींना देण्यात यावेत अशा विविध मागण्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com