प्लाझ्मादानासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पुढाकार; डॉक्टरांकडूनही वाढता प्रतिसाद...  

भाग्यश्री भुवड
सोमवार, 29 जून 2020

राज्यासह मुंबईत कोरोनाची भीती कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातच प्लाझ्मा थेरेपी हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची भीती कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यातच प्लाझ्मा थेरेपी हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे; पण याला रुग्णांपेक्षा जास्त रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.

...अन्यथा तुमची गाडी जळून खाक होऊ शकते; अग्निशमन दलाने दिला खबरदारीचा इशारा...

पालिकेच्या नायर रुग्णालयातून आतापर्यंत प्लाझ्मा थेरेपीमुळे 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर केईएम आणि सायन रुग्णालयातही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.  केईएममध्ये आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या सहा दात्यांनी पुढाकार घेत प्लाझ्मा दान केला आहे. त्यापैकी तीन दाते हे निवासी डॉक्टर्स आहेत जे कोरोनामुक्त झाले आहेत आणि ज्यांनी पुन्हा ड्युटी जॉईन केली आहे, तर वाडिया रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरानेही प्लाझ्मा दान केला आहे. 

झोपडपट्टीपाठोपाठ आता इमारतींमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; महापालिकेनेच जाहीर केली आकडेवारी...

मेच्या शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत 150 कोरोनामुक्त रुग्णांना संपर्क करण्यात आला आहे. त्यापैकी फक्त सहा जणांनीच प्लाझ्मा दान करण्याची तयारी दाखवून तो दान केला आहे, तर 32 जण स्क्रिनिंग करण्यासाठी येऊन गेले; पण ते आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे शारीरिकदृष्ट्या प्लाझ्मा दान करण्यासाठी सुदृढ नव्हते. म्हणून त्यांचा प्लाझ्मा घेता आला नसल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. 

नियम मोडणाऱ्या खासगी बसगाड्यांवर कारवाई करायची कोणी? प्रादेशिक परिवहन विभागापुढे पेच...

केईएममध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा घेण्याची सुरुवात झाली आहे. त्यात फक्त रुग्णच नाहीतर आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत प्लाझ्मा दान करणाऱ्यांपैकी तीन हे रुग्णालयातील कर्मचारी आहेत. त्यामुळे फक्त रुग्णांचाच नाही तर रुग्णालयातील कर्मचारीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दान दिलेला प्लाझ्मा आयसीयूमधील रुग्णांना दिला जाईल. 
- डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health workers in mumbai shows interest to donate plazma for curing covid patients