मिसेस फडणवीसांचे आरोग्याचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - निरोगी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर रोज स्वत:साठी 15 मिनिटे वेळ काढा, असा सल्ला अमृता फडणवीस यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आज दिला. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने आयोजित आरोग्य कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 

एमएमआरडीए, औषध प्रशासन आणि दिव्यज फाऊंडेशन यांच्यातर्फे बीकेसीमधील नवीन एमएमआरडीए इमारतीत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जे लोक सतत संगणकासमोर बसून असतात किंवा जे लोक तासन्‌ तास सतत उभे असतात त्यांना काही दुखणी उद्‌भवू शकतात. ते टाळण्यासाठी सुयोग्य व्यायाम करावा, असा सल्ला या वेळी तज्ज्ञांनी दिला. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्याला आरोग्यदायी बनवण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचेही अमृता फडणवीस यांनी सांगितले. ऍसिड हल्ल्यातील पीडितांसाठी काम करणाऱ्या साहस फाऊंडेशनला दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेशही या वेळी देण्यात आला. 

Web Title: Healthy lessons of Amruta Fadnavis