रिया चक्रवर्तीची रवानगी भायखळा तुरुंगात, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

पूजा विचारे
Wednesday, 9 September 2020

रियाच्या जामीनासाठी तिचे वकिल आज सेशन्स कोर्टात (सत्र न्यायालय) गेले. सेशन्स कोर्टात तिनं जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या विशेष सुनावणी होणार आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली आहे. 

मुंबईः  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मंगळवारी अटक केली. त्यानंतर रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज रियाची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान रियाचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर एनसीबीनं ही मोठी कारवाई केली.  दरम्यान रियाच्या जामीनासाठी तिचे वकिल आज सेशन्स कोर्टात (सत्र न्यायालय) गेले. सेशन्स कोर्टात तिनं जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर उद्या विशेष सुनावणी होणार आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली आहे. 

या सुनावणीवेळी रियाचा भाऊ शौविक याच्याही जामीनावर अर्जावर सुनावणी होईल. रियाला मंगळवारी दुपारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर रियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. 

 

रविवारपासून सलग तीन रियाची चौकशी करण्यात आली होती. तीन दिवस चौकशी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला अटक केली. तीन दिवस एनसीबीनं रियाची जवळपास १५ तास चौकशी केली. 

रियाला एनसीबीनं कलम २७ (अ) अंतर्गत अटक केलीय. ड्रग्स तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा गुन्हाही तिच्यावर दाखल आहे. त्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही. रियाच्या आधी तिचा भाऊ शौविक याला अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक केली.

Hearing bail applications Rhea Chakraborty held 10th September Special Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing bail applications Rhea Chakraborty held 10th September Special Court