मनसेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांविरोधात मनसेने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. 

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांविरोधात मनसेने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. 

नगरसेवक दिलीप लांडे, हर्षला मोरे यांच्यासह सहा नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरास कोकण विभागीय आयुक्तांनीही मान्यता दिली आहे. त्याविरोधात मनसेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेचा उल्लेख बुधवारी न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला. जूनमध्ये याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली; मात्र तातडीने सुनावणी करण्यास खंडपीठाने नकार देत ऑगस्टमध्ये सुनावणी निश्‍चित केली. मनसेचे सरचिटणीस शिरिष सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Web Title: hearing on MNS petition