राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात जुलैमध्ये सुनावणी

राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात जुलैमध्ये सुनावणी

भिवंडी -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएसच्या) बदनामीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयात खटला सुरू असून शनिवारी दुपारी या खटल्याची सुनावणी होती. मात्र, राहुल निवडणूक कामकाजात व्यस्त असल्याने तसेच याचिकाकर्ते राजेश कुंटे हे कामकाजानिमित्त बाहेर गेल्याने न्यायालयात पुढील तारीख मागण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणीची पुढील तारीख ६ जुलै ठेवण्यात आल्याची माहिती ॲड. नारायण अय्यर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडीतील सोनाळे गाव येथील क्रीडांगणावर ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या मेळाव्यात राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाने आरएसएसची बदनामी झाल्याने आरएसएसचे भिवंडी कार्यवाहक कुंटे यांनी १९ मार्च २०१४ रोजी याचिका दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com