सर्वात कमी वयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - मुंबईत राहणाऱ्या माधवी विश्‍वकर्मा या नऊ वर्षांच्या मुलीने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. हृदय प्रत्यारोपणानंतर तिचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो पहिला वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

मुंबई - मुंबईत राहणाऱ्या माधवी विश्‍वकर्मा या नऊ वर्षांच्या मुलीने तिचा पहिला वाढदिवस साजरा केला. हृदय प्रत्यारोपणानंतर तिचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो पहिला वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

माधवी विश्‍वकर्मा ही हृदय प्रत्यारोपण झालेली सर्वात लहान रुग्ण होती. माधवीला सात वर्षांच्या मुलाचे हृदय बसविण्यात आले. मुंबई फिरायला आलेल्या, परदेशात राहणाऱ्या भारतीय मुलाचा अचानक मेंदू मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतला होता. या अवयवदानाने माधवीला हृदय मिळाले आणि तिला नवीन आयुष्य मिळाले. 31 जानेवारी 2016 ला माधवीवर शस्त्रक्रिया झाली होती. माधवीची आई स्मिता हिने दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाने अवयव दान केले आहे, त्याचा फोटो ते त्यांच्या घराच्या देव्हाऱ्यात लावतात.

फोर्टीस रुग्णालयातील डॉक्‍टर अन्वय मुळे यांनी माधवीवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती. प्रत्यारोपण झालेले कुटुंब अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी पावले उचलत आहेत, हे अत्यंत आनंदाचे असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

Web Title: heart transplant surgery