मुंबईकर उकाड्याने हैराण 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती. 

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस पडला. अक्कलकोट, करमाळा, मिरज, सांगली, पंढरपूर, उस्मानाबाद, उमरगा, आष्टी या भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर होता. पुणे, महाबळेश्‍वर येथे पूर्वमोसमी पाऊस पडला. पुण्यात 25; तर महाबळेश्‍वमध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली. अमरावतीत 11 मिमी पावसाची नोंद झाली. 5 जूनपर्यंत राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. 

हवामानाचा अंदाज - 
2 जून : राज्याच्या अनेक भागांत सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता. 
5 जून : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता. 

Web Title: heat wave in mumbai