वरळीत साधना हाऊसमध्ये भीषण आग

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

वरळीतील महिंद्रा टॉवरच्या मागे असणाऱ्या साधना इमारतीला ही आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

मुंबई : वरळीतील साधना हाऊस इमारतीला आज (शनिवार) भीषण आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर अखेर ही आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

वरळीतील महिंद्रा टॉवरच्या मागे असणाऱ्या साधना इमारतीला ही आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. तर बचावकार्य करणाऱ्या जवानांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.

Web Title: Heavy Fire in Mumbai Worli Sadhana House